पुणे -प्रतीनिधी
रावेत येथील लंडन ब्रिज वरून एक अंगावर काटा आणणारी मन सुन्न करणारी घटना घडली आहे . तरुणाचे ऑनलाइन जुगारात सुमारे १५ हजार रुपये गमावल्यानंतर मानसिक तणावाखाली जाऊन त्याने थेट टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला . (Suicide Attempt) पण पोलीसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे तरुणाचे प्राण वाचले .(Saved A Life)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने सामाजिक माध्यमावर किंवा गेमिंगवर १५ हजार रुपये गमावल्यामुळे मानसिकदृष्ट्या दुखी होता. त्याने पुलावर जाऊन संरक्षक जाळीच्या आत उभा राहून नदीचे पाणी दाखवत तात्काळ आत्महत्येची धमकी देणारा व्हिडिओ कॉल आपल्या आईला केला. फोनवरून त्याने जाऊन उडी मारणार असल्याचा इशारा दिला (Ravet Police)
आईने फोनवरून मोठ्याने रडत, ओरडत आणि “असं करू नकोस” अशी विनवणी केली; (London Bridge Ravet) ती काहीशा शेकडो किलोमीटर दूर असल्याने थेट हस्तक्षेप करु शकली नाही. तरीही तिच्या विनवण्या ऐकूनही तरुण आत्महत्येच्या निर्णयावर ठाम होता.
सदर वेळी रावेत पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल आशिष बोटके (Constable Ashish Botke ) आणि दशरथ सदगीर (Constable Dashrath Sadgir) गस्त घालत होते. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून शांतीने संवाद साधला आणि योग्य वेळी थेट हस्तक्षेप करून तरुणाला पुलाच्या कडेकडेवरून खाली सुरक्षितपणे उतरवले.
पोलिसांनी नंतर तरुणाचे समुपदेशन केले आणि त्याला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. पोलीसांनी सांगितले की, वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे एका आईची कुशी रिकामे होण्यापासून वाचली आहे.
