Pune Crime : पुण्यात खळबळ! डेक्कन परिसरात प्रसिद्ध उद्योगपतीने स्वत:ला संपवलं, हॉटेलमध्ये भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह
पुणे : प्रतिनिधी सॅलिसबरी पार्क परिसरातील ६१ वर्षीय उद्योगपतीचा मृतदेह शनिवारी दुपारी डेक्कन परिसरातील आपटे रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत आढळून आला. (PuneMysteryDeath) शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या या उद्योगपतीच्या संशयास्पद मृत्यूमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.(DeccanHotel) त्यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारपासून संपर्क मिळत नसल्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.(SalisburyPark) शनिवारी दुपारी हॉटेल कर्मचाऱ्यांनी डेक्कन जिमखाना पोलीस…
