पुणे, प्रतिनिधी
पुणे येथील नववे संयुक्त दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांनी विशेष सारांश दावा इन्फिनिटी एंटरप्रायझेस यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, एका महिन्यात १० लाख २३ हजार ७१३ रूपयांची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अर्जादारास दिलासा मिळाला आहे.(Pune Court)
अर्जदार संस्थेने प्रतिवादी फर्म एम/एस न्यू टाइम ऑन व तिच्या भागीदार आनंद प्रभाकर थोरात, संजय मेटकरी, प्रभाकर थोरात व सुदर्शन थिटे, यांना घड्याळे, सुटे भाग व इतर साहित्य पुरविले होते. त्याबदल्यात प्रतिवादींकडून १० लाख २३ हजार ७१३ रुपयांचा धनादेश देण्यात आला. मात्र, धनादेश बँकेत जमा केल्यानंतर तो फंड इनसफिसिएंट (Funds Insufficient) या कारणास्तव रक्कम जमा (चेक बाऊन्स) होऊ शकली नाही. नंतर अर्जदाराने नागरी प्रक्रिया संहिता (CPC), १९०८ चे आदेश XXXVII (Order XXXVII) हे ‘संक्षिप्त प्रक्रिया’ (Summary Procedure) अंतर्गत विशेष सारांश दावा दाखल केला. वादी यांनी अॅड. प्रसाद विराज निकम यांच्यामार्फत न्यायालयात सदर दावा दाखल केला होता.
अर्जदारांच्या वतीने अॅड. प्रसाद विराज निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने प्रतिवादींना समन्स बजावूनही त्यांनी नियमानुसार प्रभावी बचाव उभा केला नाही. एका प्रतिवादीने ‘Leave to Defend’ अर्ज दाखल केला असला तरी त्याचा पाठपुरावा न केल्याने तो अर्ज निकाली काढला. न्यायालयाने फिर्यादीने सादर केलेले धनादेश, बँकेचा रिटर्न मेमो व इतर कागदपत्रांचा विचार करून फिर्यादीचा दावा सिद्ध झाल्याचे मान्य केले.(CheckBounce)
त्यानुसार न्यायालयाने: प्रतिवादींना रक्कम एका महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश दिले. दावा दाखल केल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष वसुली होईपर्यंत वार्षिक १० टक्के दराने व्याज देण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने सीपीसी (CPC) कलम ३४ अंतर्गत १० टक्के व्याज मंजूर केले. त्यांच्या बाजूने खर्चासह डिक्री मंजूर करण्यात आली. सदर प्रकरणात अॅड. प्रसाद विराज निकम यांना अॅड. मन्सूर तांबोळी व अॅड. शुभम बोबडे यांनी सहकार्य केले.
Pune Court : पुणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : एका महिन्यात रक्कम देण्याचे आदेश
