पुणे -प्रतिनिधी
सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणणाऱ्या पोलिसांकडून (Police) सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणाची अपेक्षा केली जाते. दुर्जनांचा नाश करण्यासाठी पोलीस पुढे येऊन नागरिकांना धीर देतील, आधार देतील असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, अनेकदा पोलिसांकडूनच सर्वसामान्यांवर अन्याय केला जातो, अत्याचार केला जात असल्याचं पाहायला मिळतं. आता, बारामतीतूनही (Baramati) अशीच एक धक्कादायक घटना समोर समोर आली आहे .बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत
एका पोलिसांवर महिला वकिलाने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा आणि मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित महिलेची ओळख कायदेशीर कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आली असून, तिचा उल्लेख “निर्भया” या काल्पनिक नावाने करण्यात आला आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रमेश मोहन जाधव (बकल क्र. ५६१, सध्या खडकी, पुणे; मूळ रा. बारामती) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये २७ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक वाढवली, नातेवाईकांसह तिच्या घरी विवाहाबाबत चर्चा केली आणि एका मंदिरात स्वतःच्या गळ्यातील साखळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून घालत तिला “कायदेशीर पत्नी” म्हणून संबोधले. त्यानंतर आरोपीने जेऊर आणि निंभोरे परिसरात तिला पत्नी म्हणून परिचय करून देत सहजीवन केल्याचा आरोप आहे; या काळात महिला गर्भवती राहिली. गर्भधारणेनंतर आरोपीने शारीरिक, मानसिक व आर्थिक जबाबदारी नाकारली, संशय घेणे, वाद घालणे, उपचारांसाठी मदत न करणे आणि गर्भारपणात एकटे सोडणे, असा त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे हि वाचा : आधी प्रेम , मग गेम ! दोस्त दोस्त न रहा पत्नीसोबत अनैतिक संबधाच्या संशयातून मित्राची हत्या
२० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीने एका मुलीला जन्म दिला असून मुलगी आरोपीपासून झालेली असल्याचा दावा तिने केला आहे; जन्मानंतरही आरोपीने तिला किंवा मुलीला स्वीकारण्यास नकार दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, CDR, व्हॉट्सअॅप चॅट, छायाचित्रे, व्हिडिओ, लॉज नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदार जबाब, वैद्यकीय व प्रसूती अभिलेख, बँक कागदपत्रे व इतर डिजिटल पुरावे जप्त करून पडताळणी सुरू आहे; पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.
