पुणे -प्रतिनिधी
पत्नीसोबत अनैतिक संबध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना 26 जुलै रोजी उघडकीस आली .(PuneCrime)
गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (Gaurav Wakkar)(वय 24, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) असे मृताचे नाव असून मृतदेह मोकळ्या जागेत झुडपांमध्ये पोत्यात आढळून
आला . याप्रकरणी पोलिसांनी मुकेश विठ्ठल सोनवणे (Mukesh Sonawane)आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (Janhavi Patole) (वय 19) अटक केली आहे .
मृत गौरवची आई कांचन अशोक वायकर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police)तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आढळून आला .मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मिडीयावर छायाचित्र प्रसारित केले . अन अखेर मृताची ओळख पटली .अन मृत गौरव मुकेश आणि जान्हवी यांच्यासोबत राहत असल्याची माहिती समोर आली आणि मागील काही दिवसांपासून गौरव आणि मुकेश यांच्यात एका संशयावरून वारंवार वाद होत असल्याचे समोर आले. ,पोलिसांनी चौकशीसाठी मुकेश आणि जान्हवी दोघांना ताब्यात घेतले असता मुकेशने 24 ते 26 जुलैदरम्यान गौरवचा गळा दाबून खून केल्याचे कबुल केले . मृतदेह लपवण्यासाठी मुकेशने पत्नी जान्हवीची मदत घेतली. दोघांनी मिळून मृतदेह पोत्यात भरला आणि तो निर्जन ठिकाणी नेऊन टाकला.
या प्रकारनाने शिक्रापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.(Pune Police)
