Hadapsar : अन् चोरट्यांना तिजोरी उघडली नाही; तरीही हडपसरमध्ये 98 लाखांची चोरी

पुणे -प्रतिनिधी

शहरात सतत घरफोड्या होत असून,(Pune Theft) चोरट्यांनी आता हडपसरमधील एका सराफी पेढीच फोडली आहे. (Hadapsar Jewelry Heist)धक्कादायक म्हणजे या पेढीतील सोने ठेवली जाणारी तिजोरी फुटली नाही, तरीही चोरट्यांनी ९८ लाख रुपयांचा (98 Lakh Loot) ऐवज चोरट्यांच्या हाती लागला आहे. केवळ अवघ्या सव्वा तासांत ही चोरी केली असून, अद्यापही हडपसर पोलिसांना या चोरट्याचा थांगपत्ता लागलेला नाही. हे चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.(Safe Crackers Pune )

याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात ५८ वर्षीय सराफ व्यावसायिकाने तक्रार नोंदवली असून, त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री सव्वा एक ते अडीच वाजता मगर आळीत असलेल्या ‘परशुराम विष्णु तळेगांवकर’ सराफी पेढीत घडली. तक्रारदार विजयानगर कॉलनीतील सदाशिव पेठेत राहतात. पेढी बंद केल्यानंतर चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत शिरून डिस्प्लेवरील चांदीचे साहित्य आणि दोन तोळे सोन्याचे दागिने चोरले.(Gold Thieves Caught On CCTV)

घटनास्थळी परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे,(DCP Rajkumar Shins=se) गुन्हे शोध शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे आणि हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मलमे यांनी पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन ते चार चोरटे कैद झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक फिरोज मुलाणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *