Pune Crime :वायआरके व्हेंचर्सच्या यूव्ही होम्स साईटवर दुर्घटना बाणेरच्या बांधकाम साईटवर कामगाराचा मृत्यू; ब्लिडरसह इतरांवर गुन्हा

पुणे -प्रतीनीधी

बाणेर येथील (Baner Accident) पल्लोड फार्म्स परिसरातील वायआरके व्हेंचर्सच्या ‘यू.व्ही. होम्स’ बांधकाम साईटवर २८ मार्च रोजी दुपारी लोखंडी पाईप कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. (Worker Death )साईटवर सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप करत कंपनी अधिकाऱ्यांवर भान्यास १०६(१), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Iron Pipe Fall )

करिम चमत्कार शेख (३५) हे शटरिंग व काँक्रीटचे काम करत असताना वरून अचानक लोखंडी पाईप व जाळी त्यांच्या डोक्यावर पडली. गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.(YRK Ventures) फिर्यादी रबिऊल राहीद शेख (३२, रा. बावधन) हे मृतकाचे बहिणीचे पती असून, त्यांनी तक्रार दिली आहे.(UV Homes)

या प्रकरणी इंजिनिअर शुभम राजेश अवस्थी (२८), विशाल व्यंकटराव काटे (४९), वायआरके व्हेंचर्सचे मालक व यू.व्ही. होम्स प्रोजेक्ट मॅनेजमेंटशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, साईटवर सेफ्टीसाठी आवश्यक जाळी व पाईप काढताना योग्य खबरदारी घेतली गेली नाही, ज्यामुळे ही दुर्घटना घडली.

या घटनेमुळे पुण्यातील बांधकाम साईटवरील कामगार सुरक्षेच्या नियमांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. फिर्यादीने निष्काळजीपणाचा स्पष्ट आरोप केला असून, कंपनीने सुरक्षितता उपाययोजना दुर्लक्षित केल्याचे नमूद केले आहे.(Construction Safety)
भान्दारकर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, (Pune Crime)सहाय्यक पोलिस निरीक्षक केकान यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. स्थानिक कामगार संघटना व नागरिकांकडून बांधकाम क्षेत्रातील सुरक्षितता कायद्यांचे काटेकोर पालन करण्याची मागणी जोर धरली आहे. अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याने ठेकेदार व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *