पुणे -प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुखी संसारात मिठाचा खडा पडला. विवाह करून ज्या पत्नीचा हात धरून आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले, त्याच पतीने आपल्या पत्नीचा क्रूर पद्धतीने जीव घेतला. कारण ठरलं चारित्र्याचा संशय.(Crime Update )
पिंपरी चिंचवडमधील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Pune Chakan Local Crime)परिसरात राहणाऱ्या रफिक पठाण (Rafik Pathan) (वय 32) याने आपली पत्नी डीमा रफिक पठाण (Dima Pathan) (वय 27) हिची घरातील मिक्सरची वायरने गळा आवळून क्रूर पद्धतीने हत्या केलीय. रफिक आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि याच कारणावरून त्यांच्यात अनेकदा वादाच्या ठिणग्या पडत होत्या, ज्याचा शेवट अशा दुर्दैवी हत्येत झाला.
रफिक पठाण आणि डीमा पठाण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरातील रहिवासी होते लग्नानंतर त्यांचा संसार फुलला आणि काही दिवस सुखाचे गेले , मात्र अलीकडे पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाची जागा संशयाने घेतली. प्राथमिक माहितीनुसार, रफिक अनेकदा डीमा वर विनाकारण संशय घेत असे आणि घरात यावरून दररोज भांडणे होत असत. हा वाद एक दिवस इतका भयानक वळण घेईल आणि हत्येपर्यंत पोहोचेल, अशी कल्पना कुटुंबातील कोणीही केली नव्हती.
हत्येची दिवशी नेमकं काय घडलं ?
घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये पुन्हा एकदा जोरदार वादावादी झाली आणि रागाच्या भरात रफिकने आपला ताबा गमावला रागाच्या भरात रफिकने घरातील मिक्सरची वायर घेतली आणि तिचा गळा आवळून हत्या केली.
आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर :
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी रफिक शांतपणे चाकण पोलीस ठाण्यात गेला आणि आपण पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. महिलेचे वडील मकबूल नदाफ (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रफिक पठाणला तात्काळ अटक केली आहे.पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत .
