पुणे -प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या २०२६ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या मतदान दिवशी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड-अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद व लातूर येथील सर्व जिल्हा व कुटुंब न्यायालयांना सुटी जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या अपीलीय विभागाने मान्यता दिली असून, निबंधक (निरीक्षण-२) अदीती कदम यांनी यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.(court )
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या अधिसूचनेच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून, पुणे व औरंगाबाद येथील प्रधान कुटुंब न्यायालयांसह संबंधित जिल्ह्यांतील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांना ‘मतदान दिवस’ म्हणून सुटी देण्याची परवानगी मिळाली आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया व न्यायालयीन कामकाजी यांच्यात संतुलन साधता येईल.या सुटीच्या बदल्यात संबंधित न्यायालयांनी पुढील काळात एखादा कामकाज नसलेला शनिवार ‘कोर्ट कामकाजाचा दिवस’ म्हणून घोषित करावा आणि त्याची माहिती उच्च न्यायालयाला द्यावी, अशी अट आहे. हा निर्णय घेऊन न्यायालयीन कामकाज व मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले असून स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय मतदारांना तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ठरला आहे.
