Ketan Agrawal Murder Case : केतनला ठार मारल्याची सियाला खंत नाहीच, लॉकअपमध्ये केली भलतीच मागणी , ऐकूनच डोक्यात जाईल सणक

पुणे -प्रतिनिधी

केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरनाणे राज्यातच नव्हे तर देश हादरला आहे .सर्वत्र एकाच चर्चा सुरु आहे . वाढदिवसानिमित्त लोहगडावर गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याला 400 फुट दरीत ढकलून देणाऱ्या सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची .दोघांच वय बघाव तर २० -२५ वर्ष , एवढ्या लहान वयात असतानाही एवढी हिम्मत येते तरी कुठून ? आणि एखाद्याचा जीव घेताना , त्याला गडावरून दरील खाली ढकलून देतांना कसे हात नाही कापले ? असा प्रश्न लोकांच्या मनात आहे, बातमी वाचून लोक भावनिक झाले हळहळले ण ज्यांनी हा क्रूर गुन्हा केला, केतनला मारलं, ती सिया आणि चेतन यांना मात्र आपल्या कृत्याचा जराही पश्चाताप नाही. (Lohgad Incident)
या दोघांना २९ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्यांचे पोलीस कोठडीतील कारनामे आणि वागणे ऐकून कोणलाही संताप येईल .(Pune News)

आपल्यावर आपल्या भावी पतीच्या खुनाचा आरोप आहे . आणि त्यासाठी आपण पोलीस कोठडीत आहोत याचा पश्चाताप, खेद वा खंत याचा जराही लवलेश सियाच्या चेहऱ्यावर नाही.(Murder Case) आणि यावरून धक्कादायक आणि लाजिरवाणी गोष्ठ म्हणजे पोलिसांकडे तिने अशी गोष्ट मागितली कि पोलीस हि हैराण झाले .केतनच्या हत्येच्या गुन्ह्याखाली जेरबंद असलेल्या सियाने पोलिसांकडे ” बिअर ” दारू ची मागणी केली , अशी माहिती समोर येत आहे .

29 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवलेल्या सिया आणि चेतन यांची पोलीस चौकशी कसोशीने सुरू आहे.(Sia Goyal) दोघांनाही वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. खुनातील जबाबदारीने जरी दोघांवर गंभीर आरोप असले तरी ते नॉर्मल वर्तन करत असल्याचे पाहायला मिळाले; सियाच्या चेहऱ्यावर भांडवलदारपणाची लक्षणे स्पष्ट आहेत आणि तिला काहीच होणार नाही, असा तिचा आत्मविश्वास जाणवतो. तिच्या चेहऱ्यावर चिंता किंवा घाबराट दिसत नाही.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सियाने पोलीसांना केलेली विनंती — तिला लॉकअपमध्ये असताना दारू (बिअर) दिली जावी, अशी मागणी केल्याचे समोर आले आहे. त्या वेळी ड्युटीवर असलेल्या काही पोलीस कर्मचारी ही मागणी ऐकून आश्चर्यचकित झाले; परंतु त्यांनी तिला कडक बोलणी करून नकार दिला आणि सिया शांत झाली.(Chetan Chaudhari)

घटनास्थळी सिया आणि चेतन यांचे संबंध काहीवेळा प्रेमाचे होते, परंतु खुन उघडकीस आले्यानंतर दोघांचे वर्तणूक बदलली. पोलिसांच्या चौकशीत ते दोघेही एकमेकांवर आरोप करत असून गुन्ह्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनाही स्वतःचा सहभाग कमी दाखवायचा आहे.

चेतनच्या भूमिकेबाबतच्या दाव्यानुसार, सियासोबत पळून जायचे होते; पण सिया कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पळून जायला तयार नव्हती, त्यामुळे तिने नकार दिला आणि केतनची हत्या करावी, असा आग्रह तिने केला. तर सियाच्या दाव्यानुसार, केतनच्या हत्या करण्याची कल्पना व योजना चेतनच याच्याची होती. पोलीस सध्या या विरोधाभासी दाव्यानुसार आणि इतर पुराव्यांच्या आधारावर पुढील चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *