पुणे -प्रतिनिधी
उधार घेतलेले पैसे परत न केल्याने हत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवड परिसरातील माण गावाच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसानी अवघ्या काही तासांतच दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर एका अल्पवयीन संशयितालाही आपल्या ताब्यात घेतले आहे.(Hinjawadi)
मित्रांनीच मिळून एका १९ वर्षीय युवकाची अत्यंत निर्दयपणे हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता गणेश रंगनाथ मोगरे (Ganesha Mogre) (वय १९, मूळ रा. परभणी, सध्या रा. पारखी वस्ती, माण) हा तरुण मृत अवस्थेत आढळून आला .
तपासादरम्यान जुन्या आर्थिक वादातून घटनेच्या दिवशी आरोपी अनिकेत शिंदे आणि त्या अल्पवयीन मुलाने गणेशला गाठून त्याला बेदम चोप दिला. यादरम्यान वाद विकोपास गेला आणि मुख्य आरोपी प्रणव याने थेट पुढे होऊन गणेशचा गळा आवळला. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.आरोपीनी
खून केल्याची कबुली दिली.
नेमकं काय घडलं त्या दिवशी?
चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपी अनिकेत शिंदे (Aniket Shinde) आणि त्या अल्पवयीन मुलाने गणेशला गाठले असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक चौकशीतून असे स्पष्ट झाले की, मृत गणेशने आरोपी प्रणव याच्याकडून काही पैसे उधार घेतले होते. परंतु, ठरवून दिलेल्या मुदतीत ती रक्कम परत न केल्यामुळे यामुळे रागाच्या भरात मित्रांनीच मिळून एका १९ वर्षीय युवकाची हत्या केली .
पुण्यात मुलीचा MBA ला प्रवेश करून परतणार अख्खं कुटुंब समृद्धीवर महामार्गावर संपलं ...
या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली
या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने अत्यंत दक्षतेने आणि कार्यक्षमतेने केला. सीसीटीव्ही, प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला पकडण्यात पथकाला यश आले. या पथकाच्या चौकस तपासाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कौतुक केले आहे.पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत .
