पुणे -प्रतिनिधी
कात्रज तलाव परिसरातील कात्रज कट्टा हॉटेलसमोर सोमवारी रात्री सुमारे १० वाजता जुन्या वादातून टोळक्याने १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने डोक्यावर हातावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने सपासप तब्बल ३० वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे . (Katraj Murder) या प्रकरणात सात अल्पवयीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे .
खून झालेल्या तरुणाचे नाव गणेश रविंद्र मावळे (Ganesh Mavale) (वय १७) असे आहे .
मिळलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री गणेश हा आपल्या मित्रासोबत मोबाईल दुरुस्त करण्यासाठी गेला असताना आरोपींनी त्याला गाठले जुन्या वादाच्या रागातून गणेश वर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली .हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिासांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून गणेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.(Pune Crime)
गाडीवर बसवून काढली आरोपींची धिंड
भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार आरोपींना मुसक्या आवळल्या
आणि ज्या परिसरामध्ये गणेशची हत्या करण्यात आली होती, त्याच परिसरात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची भर पावसात गाडीला बांधून धिंड काढली भररस्त्यात काढण्यात आलेल्या या धिंडीमुळे गुन्हेगारांचा माज उतरवणेआणि पोलिसांचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत .
