पुणे -प्रतिनिधी
विविध कारणांनी गेल्या काही महिन्यात हडपसर पोलिस ठाण्याचे प्रमुख प्रभारी सतत बदलत असताना नुकतीच हेमंत पाटील (Hemant Patil) यांची वरिष्ठ निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. पदभार स्वीकारताच पाटील यांनी सेक्स रॅकेटचा पहिला दणका देत बेकायदेशीर धंद्यांविरोधात सज्जड इशारा दिला आहे. मगरपट्टा येथील सिझन मॉलसमोरील द कॉस्मो पॉलिस बिल्डिंगमध्ये द फॉरेवर नावाचे स्पा सेंटर छापा टाकून सेक्स रॅकेटचा (Spa Raid) पर्दाफाश केला आहे. (Hadapsar Police)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दोनच दिवसांपुर्वी पदभार स्विकारला आहे. हेमंत पाटील यांनी यापुर्वी हडपसर पोलिस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक म्हणून काम केले आहे. ते तपास पथकाचे देखील प्रमुख होते. पुण्यातील विविध पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक असताना त्यांनी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. आता त्यांची हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
पदभार स्वीकारताच त्यांनी हद्दीतील अवैध धंद्याविरोधात कारवाईची मोहिम उघडली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत स्पा मालकीन आणि आणि मॅनेजर याच्यासह दोघांविरु्द्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईमुळे हडपसर परिसरातील अवैध्य धंदे करणाऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे नागरीकांकडून स्वागत केले जात आहे.(Season Mall)
छाप्यामध्ये तीन पीडित तरुणी मिळून आल्या. दोघे आरोपी तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होते. त्यातून मिळणाऱ्या पैशावर हे दोघे आपली उपजीविका भागवत असल्याचे समोर आले आहे. दोघे आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणात स्पा मालकीन अश्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) आणि मॅनेजर रकबुल अबुल हुसेन याच्यासह दोघांवर कारवाई करण्यात आली. पुढील तपास गुन्हे निरीक्षक नीलेश जगदाळे करीत आहेत.
मटका, जुगार, गुटखा, अवैध स्पा सेंटर आणि इतर बेकायदेशीर व्यवसायावरही अशाच पद्धतीने सातत्याने कारवाई ह्वावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकाने केलेल्या या कारवाई बेकायदेशीर धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले असून ,पुढील काळात अशा कारवाचा इशारा दिला आहे.
