पुणे -प्रतीनिधी
आपल्या पतीवर संतापलेल्या एका महिलेने चक्क पोलिसांत तक्रार दिली आहे. महिलेची तक्रार ही नवरा बायकोतील नेहमीसारख्या भांडणाबद्दल नाही. तर, तिचा पती गे असल्यामुळे आणि त्याचे पुरुषांसोबत संबंध सुरू असल्याचा दावा करत
तिने ही तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांत दाखल केली आहे.(Pune)
एका ४४ वर्षीय महिलेने पुणे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘माझे लग्न सुमारे 2006 मध्ये झाले , सुरूवातीच्या काळात सर्व काही ठीक होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी त्यांच्या वर्तनात प्रचंड बदल झाला. तो माझ्यापासून नेहमीच दूर राहात असे. सुरूवातीला मला वाटले की, त्याचे दुसऱ्या कोणत्या महिलेसोबत अनैतिक संबंध असावेत. पण, मी चुकीची ठरले.’तक्रारदार महिला आपल्या तक्रारीत पुढे म्हणते, ‘मी खरोखरच चुकीची ठरले. माझ्या पतीचे कोणा महिलेसोबत अनैतिक संबंध नव्हते तर, अन्य पुरुषांसोबत अनैतिक संबंध सुरू होते .(Crime News)
विशेष म्हणजे, लग्नापूर्वी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट पतीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाने जाणीवपूर्वक लपवून ठेवली आणि सत्य लपवून आपले लग्न लावून दिले, असा आरोपही पीडितेने केला आहे. या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
सासरच्या मंडळींकडून आपल्याला त्रास देण्यात आला तसेच मानसिक दबाव निर्माण करण्यात आल्याचा दावा तिने केला आहे
सासू, सासरे, दीर आणि जाऊ यांच्यावरही आरोप केले आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police) महिलेन धाव घेतली , आपण अनेक वर्ष परिस्थिती सहन केल्यानंतर मानसिक त्रास आता असह्य झाल्याने तिने सासरच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे पुढील सखोल तपास पोलीस करत आहेत .
