पुणे -प्रतीनीधी
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्वाची मोठी अपडेट समोर आली . देशभर गाजत असलेल्या हत्याकांड प्रकरणात चेतन चौधरीच्या वर्गमित्राचंही नाव समोर आलं होत . चेतन आणि सिया गोयलने सर्वातआधी केतनच्या हत्येचा प्लान त्यालाच सांगितल्याची माहिती समोर आली होती , (Ketan Agarwal)
त्याला 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरही सोबत येण्यासाठी विचारलं होतं. परंतु त्याने नकार दिला. पुणे पोलीस आता त्याच चेतन चौधरीच्या वर्गमित्राला तिसऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत .
चेतन चौधरी (Chetan Choudhary)आणि त्याची मैत्रीण सिया गोयल यांनी रितेशसोबत केतनच्या हत्येबाबत चर्चा केल्याचा पोलिसांना संशय आहे. केतनची हत्या कशा पद्धतीने करायची, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती तपासात समोर आल्याचं सांगितलं जात आहे. (Ketan Agarwal)
<iframe width=”560″ height=”315″ src=”https://www.youtube.com/embed/OrhBWRrSnkw?si=MxUXUmvZ–qMDmyF” title=”YouTube video player” frameborder=”0″ allow=”accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share” referrerpolicy=”strict-origin-when-cross-origin” allowfullscreen></iframe>
सिया आणि चेतन यांनी रितेशला लोहगडला सोबत येण्यासाठी वारंवार आग्रह केला होता. मात्र, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जात असून, रितेशच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
