पुणे -प्रतिनिधी
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास एक धक्क्दादाय्क घटना घडली .रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिस(जीआरपीएफ) अक्षय महादेव बोंबाळे(Akshay Bombale ) (वय २८, रा. पुणा गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) यांना अडवून गळा चिरल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी बोंबाळे यांनी रेल्वे रुळ परिसरात गस्त घालताना काही तरुणांना गांजा ओढताना पाहिले होते. त्यांना त्यांनी जागेवरून हटकले व हाकलून दिले. त्याचा राग मनात धरूनच आरोपींनी हे धक्कदायक कृत्य केल .(Pune )
दुपारी कर्तव्यावरून घरी जात असताना साडेआठच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) कार्यालयासमोरील रस्त्यावर, ससून हॉस्पिटलजवळील फुटपाथवर आरोपींनी बोंबाळे यांना अडवले. दुचाकी अडवून शिवीगाळ सुरू केली. “तू माझ्या आईला दारू व गांजा पितोस, हे का सांगितले?” असे म्हणत वाद घातला.(Bundgarden Police)
वाद वाढल्यानंतर एका आरोपीने बोंबाळे यांना खाली पाडून धारदार चाकूने गळा चिरला व छातीवर वार केले. दुसऱ्याने डोक्यात दगड मारला. त्यानंतर आरोपींनी बोंबाळे यांच्याजवळील मोबाईल व दीड लाख रुपयांची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला.
या हल्ल्यात बोंबाळे गंभीर जखमी झाले. त्यांच्या गळ्यावर ९ तर छातीवर २ टाके पडले आहेत. डोक्यालाही गंभीर मार लागला आहे.
घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने तातडीने कारवाई केली. सहाय्यक निरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक प्रदीप शितोळे (Pradip Shitole), कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड, महेश जाधव व त्यांच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे नाना पेठेतून आरोपींना पकडले.
रॉकी रणजित पात्रौ (Rocky Patrou) तसेच विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
