पुणे -प्रतिनिधी
संसाराची नवी स्वप्ने उराशी बाळगून सासरी आलेल्या अवघ्या 25 वर्षांच्या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे . ही दुर्दैवी घटना कोथरूड परिसरात घडली . लग्नाला अवघे काही महीने झाले असतानाच नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याच समजल्याने संसारात तनाव निर्माण झाला होता , पतीकडून रोज कथित आपमनस्पद वागणूक , शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितीने आत्महत्या केल्याचा आरोप आहे . (Pune News)
सोनाली गोविंद पवारअसं मृत विवाहितेचं नाव असून, तिचा पती गोविंद पवार याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Women Crime )
मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीच सोनाली आणि गोविंद यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. सुरुवातीला संसार सुरळीत चालला होता; परंतु अल्पावधीतच गोविंदच्या आयुष्यातील एक धक्कादायक बाब सोनालीच्या लक्षात आली. गोविंदचं आधीपासूनच दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि विवाहानंतरही त्याने ते संबंध तोडले नव्हते.(Husband Booked )याच शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून 22 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास, सुतारदरा येथील लेन क्रमांक 29 मधील निवासस्थानी कोणीही हजर नव्हते.(Maharashtra Crime)
त्यावेळी अत्यंत तणावाखाली गेलेल्या सोनालीने घरातील छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास लावून स्वतःला संपवलं. पोलिसांनी गोविंद पवार याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला असून, कोथरूड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Love Marriage केलं अन वैर पत्करलं ! सासुरवाडीकडून जावयावर कोयत्याने हल्ला
