पुणे -प्रतिनिधी
: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात पती-पत्नीमधील वादाला हिंसक वळण लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्यावर हल्ला करून नाक कापले आणि गटारात फेकल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या हल्ल्यात सासू-सासऱ्यांनीही पतीला मदत केल्याचे महिलेने म्हटले आहे. (Marital Dispute ) मात्र, महिलेच्या आरोपांवर अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसून, पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे.(Crime News)
साधना असे पीडित महिलेचे नाव आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पती दीपकने वादादरम्यान तिच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर तिचे नाक कापून ते गटारात फेकले. तसेच सासू आणि सासऱ्यांनी तिचे हात पकडून ठेवल्याचा आरोपही तिने केला आहे.(Domestic Violence )
अडीच महिन्यांनंतर घरी परतली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधना अडीच महिन्यांपूर्वी सासरचे घर सोडून एका तरुणासोबत गेली होती. गुरुवारी ती अचानक शेजाऱ्याच्या घराच्या छतावरून उडी मारून पुन्हा पतीच्या घरी परतली. तिच्या परतण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.(Woman Attacked )
घटनेची माहिती मिळताच सांडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी साधना आणि दीपक या दोघांना पोलिस ठाण्यात आणले. साधनाला प्राथमिक उपचारांसाठी सांडी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती पाहता पुढील उपचारांसाठी हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पतीच्या कुटुंबीयांकडून प्रत्यारोप
दरम्यान, दीपकच्या कुटुंबीयांनी साधनावरही गंभीर आरोप केले आहेत. साधना मुलांना सोबत नेण्याचा प्रयत्न करत होती. यावरून झालेल्या वादात तिने दीपकच्या गुप्तांगाला चावा घेतल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच साधनाने स्वतःचे डोके जमिनीवर आपटून घेतल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले.
साधना आणि दीपक यांचा विवाह सुमारे दहा वर्षांपूर्वी झाला असून, त्यांना आठ, सहा आणि तीन वर्षांच्या तीन मुली आहेत. सध्या साधनाने पोलिसांत औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. दीपकच्या आईने तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपांची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.
