जामखेड/प्रतिनीधी..
जामखेड शहरातील सिध्दार्थ नगर येथे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पन करुन,सामुदायिक बुध्दवंदना घेण्यात आली व प्रतिमेस अभिवादन करुन 70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्सवात पार पडला डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिवशी नागपुर येथे 1956 साली हिंदु धर्माचा त्याग करुन लाखो अनुयायीं सोबत बौध्द धर्माचा स्वीकार केला होता म्हणून विजयादशमी दिवशी देशभर धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो
याचधरती वर जामखेड शहरात देखील साजरा करण्यात आला (Dhamma Chakra PravartanDin)
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले म्हणाले की शहारातील बाजारतळातील बुध्दविहाराच्या अपुर्ण बांधकामामुळे दोन वर्षापासून व्यापक स्वरुपाचा कार्यक्रम घेता येत नाही बुध्दविहाराचे काम लवकरात लवकर पुर्ण करुन बौध्द बांधवांसाठी बुध्दविहार खुले व्हावे हि प्रार्थना केली (Siddharth Nagar)
भारतीय बौध्द महासभेच्या सौ.सुरेखा सदाफुले म्हणाले की बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार अधिक गतिमान करुन पुढच्या वर्षी मोठ्या स्वरुपात धम्मरॅली काढून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करु यावेळी जेष्ठ बाळासाहेब सदाफुले व उषाबाई सदाफुले यांच्या हस्ते दिपप्रजल्वन करण्यात आले
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,सचिन सदाफुले,बाळासाहेब सदाफुले,प्रमोद सदाफुले,संजय घायतडक,अशोक घायतडक,मिलिंद भोसले,कल्याण काळे,रोहीत सदाफुले,हौसराव घायतडक,शेखर घायतडक, भारतीय बौध्द महासभेच्या सौ.सुरेखा सदाफुले,शैला सदाफुले,नंदा सदाफुले,सुरेखा सदाफुले,अल्का राजगुरु,बेबीताई गायकवाड,उषाबाई सदाफुले,शालनबाई घायतडक,बेबी सदाफुले,मैनाबाई सदाफुले आदी. समाज बांधव उपस्थित होते
