पुणे -प्रतीनिधी
पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका घटनेन खळबळ उडाली आहे .दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका मित्रानेच मित्राची निर्घूण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे .या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे .(Sahakar nagar Murder)
मिळलेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. (Drinking Dispute) याप्रकरणी किरण ऊर्फ बिट्या रवी वाघमारे (Kiran Waghmare ) (वय २४) या फूल विक्रेत्याला अटक केली आहे.(Fatal Incident)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुण शुक्रवारी रात्री एकत्र बसून दारू पित होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने सिमेंटचा ठोकळा आणि फरशीने तरुणाच्या डोक्यावर वार करत त्याची हत्या केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
