पुणे -प्रतिनिधी
बहिणीशी अफेअर असल्याच्या रागातून भावाने तिच्या मित्राचा काटा काढला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे .भावाने साथीदाराच्या मदतीने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या (Fursungi Police)हद्दीत संकेत विहार येथील कचरा डेपो शेजारील लेन मध्ये घडली .याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
तनिष्क राइकवार (Tanishk Raikwar) (वय १७, रा. हेवन पार्क, काळेपडळ) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी रोहित संदीप खाडे (Rohit Khade)(वय २०, रा. पानसरे नगर, येवलेवाडी) याला अटक केली आहे. तर याबाबत अजय हरीश राइकवार (वय ४९, रा. कोंढवा बुदुक) यांनी फुरसुंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनिष्कचे आरोपीच्या बहिणीसोबत अफेअर होते त्याला रोहित याचा विरोध होता. प्रेमसंबंधातून तनिष्क यानेच बहिणीला पळवून नेले, या संशयावरुन रोहित खाडे व त्याच्या साथीदारांनी तनिष्क याच्या डोक्यात दगड व धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला. त्यानंतर आरोपी स्वतः वानवडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले. त्यांनी तनिष्क राइकवार हत्या केल्याचे सांगितले.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भूषण पोटवडे तपास करीत आहेत.(Pune Crime)
