पुणे -प्रतिनिधी
बारामतीत 12 सप्टेंबर शनिवारी रोजी सायंकाळी ३० वर्षीय विवाहित महिलेची डोक्यावर व चेहऱ्यावर धारदार अथवा अन्य हत्याराने वार केल्यानंतर टॉवेलच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती .या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे . आरोपीने असलेल्या गर्भवती महिलेवर जखमी अवस्थेत अत्याचार करून तिची हत्या केली . अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिला हातोड्याने मारहाण केली. Baramati त्यानंतर अत्याचार करून टॉवेलने गळा आवळून तिचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे . शवविच्छेदनात महिलेच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या आहेत . (Pune)
मृत महिलेचे नाव वैशाली तानाजी पवार (वय ३०) आहे तर , तिच्या सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. तर या प्रकरणी पोलिसानी माळेगाव पोलिसांनी गणेश रामचंद्र माने (वय 26, रा. पणदरे) याला अटक केली आहे.Pune News
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार , शेजाऱ्यांनी तानाजी पवार (मृत महिलेचे पती ) रडत असल्याची माहिती त्यांची आई रंजना पवार यांना दिली. त्यानंतर रंजना पवार यांनी घरी जाऊन पाहिले असता वैशाली पवार खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले.Baramat iNews
घटनास्थळाची पाहणी आणि परिसरातील चौकशीनंतर पोलिसांना गणेश रामचंद्र माने Ganesh RamchandraMane (वय २६, रा. पणदरे) याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अत्याचार करण्याच्या उद्देशाने गणेश माने याने वैशाली पवार यांच्यावर हातोड्याने हल्ला केला. त्यानंतर अत्याचार करून हा प्रकार कोणाला सांगू नये, यासाठी टॉवेलने गळा आवळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
शवविच्छेदन अहवालात वैशाली यांच्या डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या. तसेच त्या गर्भवती असल्याचेही स्पष्ट झाले. त्यांच्या अंगावरील सोन्याचे डोरले आणि पैंजण आरोपीने नेल्याचे तपासात समोर आल्यानंतर गुन्ह्यात जबरी चोरीचे कलम वाढवण्यात आले.Crime News
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला हातोडा, घटनेवेळी परिधान केलेले कपडे आणि चोरीचे दागिने जप्त केले आहेत. गणेश माने याला न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलिसांकडून सुरू आहे.
