Pune Crime : पोलीस अधिका-याचा कारनामा ! आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; वारंवार ठेवले शारीरिक संबंध शेवटी गर्भपात अन तरुणीसोबत घडलं भयंकर …
पुणे -प्रतिनिधी खाकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यातून समोर आली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका ३१ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.(VictimDemandsJustice) एवढेच नाही तर पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचे समोर…
