पुणे -प्रतिनीधी
पुण्यात MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अधिकारी (Civil Services Aspirant) होण्याचं स्वप्न प्न उराशी बाळगून पुण्यात आलेल्या एका धाराशीव जिल्ह्यातील २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . पैशाच्या अडचणी आणि कर्जबाजारी झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पॉलिसांनी सांगितला आहे . (Pune News)
प्रथमेश दिलीप देशमुख (Prathamesh Deshmukh)(वय २८, रा. खासापुरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार ,प्रथमेश दिलीप देशमुख गेल्या दीड-दोन वर्षापूर्वी पुण्यात आला होता , तेंव्हापासून तो पुण्यात राहून एमपीएससीची (MPSC) तयारी करत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो प्रचंड पैशांच्या अडचणीत सापडला होता. पुण्यातील राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च आणि अभ्यासाचा ताण वाढत असतानाच त्याने ओळखीच्या काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. त्याच्यावर जवळपास अडीच लाख रुपयांचं देणं झालं होतं. खोलीचं भाडंही थकल्यानं तो पुरता हवालदिल झाला होता. या आर्थिक कोंडीला कंटाळून त्याने स्पर्धा परीक्षा सोडून परत गावी निघून जाण्याचा विचारही बोलून दाखवला होता. आत्महत्येपूर्वी प्रथमेशने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ती पोलिसांच्या हाती लागली आहे. यामध्ये त्याने स्वतःच्या हलाखीच्या परिस्थितीचा आणि कोणाकोणाकडून पैसे घेतले होते, त्या व्यवहारांचा सविस्तर पाढा वाचल्याचं समोर आलं आहे. या चिठ्ठीच्या आधारे विश्रामबाग पोलीस अधिक माहिती घेत आहेत.
