Pune Crime : विषारी दारू प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी निलंबित ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई

पुणे -प्रतिनिधी

हडपसर आणि फुगेवाडी परिसरातील विषारी हातभट्टी दारू (PoisonLiquorCase) प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून कडक प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या हलगर्जीपणावर उठलेल्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर काही अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगात्मक कारवाई केली आहे.(HadapsarFugewadi)

पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलाणी यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.(PoliceOfficersSuspended) विषारी दारूमुळे अनेकांचा बळी गेल्यानंतर स्थानिक स्तरावरील पोलिस यंत्रणेने वेळीच कारवाई का केली नाही, यावर नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. अवैध हातभट्टी दारूचा धंदा सुरु असताना तो आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी ठरवत ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.(PunePoliceAction)

या घटनेनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (PoliceNegligence) नागरिकांच्या सुरक्षेबाबतचा महत्त्वाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी लागल्याचे वरिष्ठांकडून स्पष्ट करण्यात आले. पुढील चौकशीत आणखी कुणाची जबाबदारी ठरते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार हाताळण्यासाठी गुन्हे शाखा आणि इतर संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. अवैध दारू विक्री साखळीमागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि स्थानिक पातळीवरील नेटवर्क यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे. प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाई करून असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *