पुणे -प्रतिनिधी
दिवे घाटाच्या (Dive Ghat)पायथ्याजवळील वडकी नाला परिसरात दोन जण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली ,आणि पोलिसांनी सापळा रचला. पूर्ण तयारी करत संशयित वाहनाची वाट पाहली दोन संशियीत तरुण दिसताच त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली ,सॅकची तपासणी करताच बॅगेत एक जिवंत मांडूळ आढळून आले . हा साप तपकिरी रंगाचा असून अंदाजे ४५ इंच लांबीचा आणि सुमारे एक किलो वजनाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे (Fursungi Police)
.
या प्रकरणात सुरेश चव्हाण (Suresh Chavan) (वय १९, रा. जगतापनगर, सोनके, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि शिवराज अनिल भोईटे (Shivraj Bhoite)(वय २१, रा. भोईटे वस्ती, वाघोली, ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांना अटक केली आहे .
रात्री गुप्तपणे सापळा रचला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी पोलीस गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, दोन जण मांडूळ विक्रीसाठी येणार आहेत .
माहिती मिळताच पोलिसांनी २२ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संबंधित ठिकाणी सापळा रचला. परिसरात पोलिसांनी नजर ठेवत संशयिताची वाट पाहण्यास सुरुवात केली.
अन पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एक मांडूळ जप्त करण्यात आला आहे.पुढील कारवाईसाठी हा साप वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पुढील कारवाई सुरू असून पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव (Psi Shamburaj Jadhav) अधिक तपास करत आहेत.
