पुणे – प्रतिनिधी
केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणात पोलीस तपासानंतर काही धक्कादायक आणि चकित करणारी सत्य समोर आली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या प्रमुख आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची चौकशी करण्यात आली असता, पोलिसांनी चेतन ला प्रश्न विचारला …. पण जर सियाला केतनसोबत लग्नच करायचं नव्हतं तर सिया आणि चेतनने पळून जाऊन लग्न का केलं नाही? केतनला का ठार मारलं? असा सवाल पोलिसांनी केला . (Pune Crime) त्याचं उत्तर चेतन चौधरीने दिलं असून उत्तर ऐकून पोलीसही हादरून गेले आहेत.(Ketan Agarwal Murder)
चेतनने पोलिसांना सांगितले की , केतनचा खून त्यांच्या पळून जाण्याऐवजी समाजातील कौटुंबिक प्रतिष्ठा वाचवण्यासाठी केला गेला.सियाला लग्न मोडून पळायचं नव्हतं. तिला त्याचा विरोध होता. असं केल्याने समाजात कुटुंबाची बदनामी होईल. अपमान सहन करावा लागेल. त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी केतनचा खून करण्याचा कट रचला .
चौकशीत उघडलेले मुख्य तपशील:
केतनच्या बहीण संजनाच्या आणि कुटुंबाच्या चौकशीतून समोर आले की फेब्रुवारीतील साखरपुड्यानंतर सिया केतनला वारंवार लोहगड किल्ल्यावर
हट्ट दह्रून घेऊन गेली . केवळ 15 दिवसांत सिया केतनला चार वेळा किल्ल्यावर घेऊन गेली होती.(Police Investigation)
घटनात्मक कालक्रम:
31 मे: सिया प्रथमच केतनला लोहगडावर घेऊन गेली.
4 जून: परत किल्ल्यावर जाण्याचा सिया ने आग्रह धरला; परंतु केतनच्या आईने प्रतिबंध केला.
14 जून: तिसऱ्यांदा किल्ल्यावर घेतले असता, allegedly सियाने केतनला धक्का दिला, परंतु तो झाडाच्या फांदीला अळंबल्याने वाचला. या घटनेनंतर सियाने साप आढळल्याचा बहाणा करून केतनला मिठी मारली.
18–19 जून: सियाचा वाढदिवस असल्याने 18 जून रोजी तिने पुन्हा केतनाला किल्ल्यावर नेण्याचा आग्रह धरला. तिथे चेतन आधीपासून उपस्थित होता; पोलिसांनी सांगितले की त्यानंतर दोघांनी मिळून केतनवर हल्ला केला.(Justice For Ketan)
