जामखेड १३ ऑक्टोबर२०२६
अहिल्यानगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. यो. सु. पैठणकर यांच्या न्यायालयात चाललेल्या एका बहुचर्चित नियमित फौजदारी खटल्याचा (क्र. १००२/२०१९) निकाल नुकताच (दि. १२ ऑक्टोबर २०२६) जाहीर झाला आहे. फिर्यादीने लावलेले आरोप सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींना सर्व कलमांमधून निर्दोष मुक्त केले आहे. Ahilyanagar News
प्रकरणाची पार्श्वभूमी व आरोप:
घटनेची तारीख व वेळ: १३ जून २०१९ रोजी सायंकाळी ७:३० वाजता.
घटनास्थळ: प्रोफेसर चौक, सावेडी, अहमदनगर.
फिर्यादी: पुष्पा प्रदिप राऊत (मूळ रा. बीड रोड, जामखेड, हल्ली रा. अहमदनगर).
आरोपी:
1. दादासाहेब लक्ष्मण शिंदे (वय २८ वर्षे, रा. मोरे वस्ती, जामखेड)
2. बाबु उर्फ बापु मधुकर गव्हाणे (वय २५ वर्षे, रा. पिंपळगाव उंडा, जामखेड)
मुख्य आरोप: जामखेड येथील प्लॉट व गाळा नावावर करून देण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीचे पती प्रदीप राऊत यांना मारहाण केली. तसेच सोडवण्यास गेलेल्या फिर्यादीचा विनयभंग करून तिच्या अंगावरील साडीचा पदर ओढला, शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. Court Verdict
याबाबत न्यायालयाने महत्त्वाचे निष्कर्ष केले असून जामखेड येथील गट क्र. १५०७/१ मधील जागेच्या (इसार पावती व जागेच्या व्यवहाराच्या) वादातून ही खोटी केस दाखल करण्यात आल्याचा बचाव आरोपींतर्फे घेण्यात आला होता, ज्यास फिर्यादी व साक्षीदारांच्या उलटतपासणीदरम्यान दुजोरा मिळाला.
यावेळी पुराव्यांचा अभाव झाला.घटनास्थळ अतिशय वर्दळीचे (प्रोफेसर चौक) असतानाही पोलिसांनी केवळ एकच वैयक्तिक साक्षीदार (गणेश चौधरी) तपासला होता आणि तो साक्षीदार देखील सरकार पक्षास साहाय्यभूत ठरला नाही.
विसंगती व जखमा नसणे: मारहाणीची मोठी घटना घडल्याचे सांगितले गेले तरी फिर्यादी किंवा त्यांच्या पतीला कोणतीही वैद्यकीय दुखापत झाल्याचा पुरावा किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयासमोर सादर केले गेले नाही. तसेच फिर्यादीच्या जबाबात आणि पुराव्यांमध्ये मोठी विसंगती आढळून आली.
अंतिम आदेश:
उपलब्ध पुराव्यांनुसार अभियोग पक्ष संशयापलिकडे जाऊन आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे, न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम ३५४, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ नुसार आरोपी दादासाहेब लक्ष्मण शिंदे आणि बाबु उर्फ बापु मधुकर गव्हाणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३७-अ नुसार प्रत्येकी १५,००० रुपयांचे वैयक्तिक जातमुचलके व जामीनपत्र घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
