by priya gaikwad
पुणे – संशायाच भूत एकदा डोक्यात शिरलं कि माणसाला कशाचेही भान राहत नाही .याच भीषण प्रत्यय चारित्र्यावर संशय घेतल्याने गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून एका तरुणावर लोखंडी हातोडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. पिंपरीतील बौद्धनगर परिसरात मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका पुरुषासह दोन महिलांना अटक केली आहे.Pimpri Chinchwad
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाच्या चारित्र्यावर त्याच्या पत्नीला संशय होता.Crime Report या कारणावरून पती-पत्नीमध्ये मागील सहा महिन्यांपासून वारंवार वाद होत होते. याच वादातून आरोपींनी तरुणाला गाठून त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.Police Action
आरोपींनी प्रथम तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी हातोडीने त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर आणि बरगड्यांवर वार केले. Pimpri Updatesया हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.PCMC News
या प्रकरणी पीडित तरुणाच्या ३० वर्षीय बहिणीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आकाश अनिल खंडागळे (वय ३२, रा. बौद्धनगर, पिंपरी) याच्यासह ५० आणि २८ वर्षांच्या दोन महिलांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत.
तुला आज जिवंत सोडत नाही.” म्हणत तरुणावर गोळीबार ….क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तरुण
